कर्णधार धोनीने केली युवराजसिंगची पाठीराखण

मिरपूर – बांगलादेशात सुरू असलेल्या, टी २० सामन्याात पाक व वेस्टइंडिज विरूद़धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र, या दोन सामन्याात टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज युवराज सिंग याची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्या‍मुळे त्याच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. असे असताना आपल्या संघ सहका-याची बाजू मांडताना धोनीने युवीची पाठराखण केली आहे. युवराज हा सध्या फार्मात नसल्याचे धोनीने कबुल केले आहे. त्याला म्हणावी तशी कामगिरी होत नसल्याने तो सध्या दडपणाखाली असल्याचे मत धोनीने व्यक्त केले.

सध्या फॉर्मात नसलेल्या युवराजसिंग हा क्षेत्ररक्षणात चपळ आहे. विंडीजविरूद़धच्या‍ सामन्यात युवराजने सातत्याने झेल सोडले आहेत. यामुळे जाणकारांसह क्रिकेटप्रेमीदेखील युवीच्या अंतिम चमूतील सहभागावर टीका करू लागले आहेत.

याबाबत बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, ‘युवराज हा टी-२० साठी साजेसा खेळाडू आहे. सध्या त्याच्यावर थोडेसे दडपण आहे. टी-२०च काय, पण क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्येही धावा होत नसतील, तर खेळाडूवर साहाजिकच दडपण येते अन् तो सातत्याने अपयशी ठरतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत अनुभवी युवराजने १९ चेंडूंचा सामना करताना १० धावाच केल्या. खरेतर त्याच्यासारख्या खेळाडूकडून झटपट धावांची अपेक्षा असते, मात्र तसे होताना दिसत नाही. युवी लवकरच फार्मात येईल.’

Leave a Comment