अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा ने सूर्यफुलाच्या आकाराचे प्रचंड मोठे अंतराळ यान विकसित केले असून ते पृथ्वीशी मिळते जुळते ग्रह शोधण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हे यान असे ग्रह सापडले की त्यांचे फोटोही काढू शकणार आहे.

पृथ्वीसारखी निर्मिती प्रक्रिया घडलेले, पृथ्वीप्रमाणेच तापमान आणि आकार असलेले ग्रह शोधण्याचे काम दीर्घकाळ सुरू आहे. सध्या कांही ग्रह त्या दृष्टीने तपासले जात असून तेथेही खडक आहेत. त्यांचे तापमान पाण्याचे अस्तित्व असण्यायोग्य आहे. त्यांचे तापमान अधिकही नाही आणि ते फार थंडही नाही. त्यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
पृथ्वीसारखे हे ग्रह आकाशमालेत नक्की आहेतच फक्त त्यांचे प्रत्यक्ष पुरावे मिळणे हा वेळेचा आणि काळाचा प्रश्न आहे असे नासाचे म्हणणे असून हे नवीन अंतराळ यान या शोधमोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावेल असा विश्वास नासातील तज्ञ व्यक्त करत आहेत.