आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज ?

ढाका- आयपीएलनंतर टीम इंडियाचे शेडूल बिजी नसल्याने भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. या बातमीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नजम सेठी यांनी दुजोरा दिला आहे. सेठी टी-२० वर्ल्डकप बघण्यासाठी आणि बीसीसीआयच्या अधिका-याची भेट घेण्यासाठी बांग्लादेशला गेले होते. त्यावेळी दोन्ही देशादरम्यान छोटेखानी मॅचस खेळता येतात का याची पडताळणी करण्यात आली.

आगामी काळात होत असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर पाकिस्तानकडे ऑक्टोबरपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी दौरा अरेंज केलेला नाही. त्यामुळे यादरम्यान भारतासोबत वनडे सीरिज खेळवली जावी असे सेठी यांचे म्हणने आहे. २००९ नंतर इतर क्रिकेट टीमने पाकिस्तानात क्रिकेट खेळायला नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दरवर्षी १ कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागत आहे.

आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाणार असल्याने होणा-या या नुकसानाची थोड़या फार प्रमाणात भरपाई होईल. म्हणून टी-२० सूपर लीगचे पाकिस्तान आयोजन करण्यात येणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. ही सीरिज अमीरात येथे खेळवली जाणार आहे.

Leave a Comment