शिर्डीतून योगेश घोलप यांना उमेदवारी ?

नाशिक: कोर्टाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याने बबन घोलप यांना तीन वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. त्यामुळे शिवसेनेकडून शिर्डी मतदारसंघातील बबनराव घोलप यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. घोलप यांनी आता त्यांच्याऐवजी मुलाला उमेदवारी द़यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बबनराव घोलप यांची उमेदवारी गेली तरी मुलाच्या़ रुपाने आगामी काळात तिकीट घोलप कुटुंबातच राहण्याची शक्यता आहे.

बबनराव घोलप यांच्या जागी त्यांचा मुलगा योगेश घोलप याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या दौ-यावर आहेत. यावेळी शिर्डीच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या मुळे ते कोणच्याा नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उमेदवार बबनराव घोलप यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याने त्यांना कोर्टाने तीन वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे. मात्र शिर्डीत बाप से बेटा सवाई ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या इच्छाशक्तीपुढे कायदाही तोकडा पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment