टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला.  स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.  तसेच ‘ब’ गटात भारताने चार गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. 

प्रथम फलंदाजीकरत वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते.  शिखर धवन शून्यावर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुस-या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. कोहली ५४ धावांवर बाद झाला. तर रैनाने नाबाद ६२ धावा केल्या. त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजकडून धोकादायक ख्रिस गेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. 

यासाठी त्याने ४९ चेंडू घेतले. तसेच संघातील अन्य फलंदाजांनाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यांनी २० षटकात सात बाद १२९ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, अमित मिश्राने दोन तर आर अश्विनने एक गडी बाद केले.

Leave a Comment