टीम इंडियाचा वेस्ट इंडीजशी मुकाबला

ढाका: बांगलादेशात होत असलेल्या‍ ट्वेण्टी२० विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी दिल्याचे सध्या आनंदाचे वातावरण आहे. रविवारी आता टीम इंडियाला वेस्ट इंडीजचा मुकाबला करायचा आहे. रविवारी सात वाजता या सामन्याला सुरूवात होणार असून टीम इंडियाला या सामन्याेत विजय मिळवून आगेकूच करायची आहे.

शुक्रवारी झालेल्या‍ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता गतवेळच्या विजेता ठरलेल्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यातही फिरकी गोलंदाजांवरच मदार आहे. या सामन्या त विंडीजचा सलमीचा फलंदाज ख्रिस गेलला टीम इंडियाचे गोलंदाज कसे रोखतात याच्या‍वरच सामन्याीचा निकाल अवलंबून आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाजीत शिखर धवन, रोहित शर्मा यांनी दमदार सलामी करून दिली. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण विराट कोहली आणि सुरेश रैनाचा फॉर्म भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. त्याशिवाय युवराज सिंगच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment