कलमाडी यांचे पुण्यातून निवडणूक लढविण्याचे संकेत

पुणे – लोकसभेसाठी तिकिट न मिळाल्याने नाराज झालेले खासदार सुरेश कलमाडी यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांशी चर्चा केली. उर्वरीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुक लढविण्या विषयीचा अंतिम निर्णय उद्या ( शनिवार) घेणार असल्याचे कलमाडी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलतना स्पष्ट केले. 

गुरुवारी कलमाडी दिल्ली वरून पुण्यात आल्यानंतर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाटी समर्थकांनी गर्दी केली होती तीच गर्दी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या वेळीही दिसून आले. सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी, निलंबन रद्द झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. या बैठकीला आमदार रमेश बागवे, पिंपरी – चिंचवडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपमहापौर बंडु गायकवाड, नगरसेवक मिलिंद काची यांच्यासाह कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

दोन तास कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना कलमाडी म्हणाले, पक्षाने मला किंवा माझ्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने मी नाराज झालो आहे. काल रात्री आणि आज सकाळी व दुपारी मी मझ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या आणखीण निम्म्या कार्यकर्त्यांशी मला चर्चा करायची आहे, त्यानंतर मी अंतिम निर्णय घेणार आहे. आज दुपारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझी भेट घेतली मात्र त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मी सांगणार नाही. लोकसभा निवडणुक लढविण्याची पुर्वतयारी मी आधीपासूनच केली आहे असे सांगत कलमाडी यांनी विश्‍वजित कदम यांचा मार्ग खडतर असल्याचे संकेत देत काही राजकिय पक्ष मला तिकिट देण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले.

Leave a Comment