
नखांवर वेगवेगळ्या रंगांची नेलपॉलिश लावायची फॅशन आता इतिहासजमा होऊ लागली असून नखांवर विविध चित्रे रेखाटण्याची फॅशन सध्या जोरात आहे. हॉलीवूड मध्ये तर तशी क्रेझच आली आहे. पण त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेळ घालवावा लागतो आणि टिच्चून पैसेही मोजावे लागतात. मात्र आता घरबसल्याच नखांवर आपल्या पसंतीची चित्रे काढता येणारे अॅप तयार करण्यात आले आहे. ४७००० डॉलर्स जमवून डिझायनर एंजल अँडरसन आणि सारा हिरिंग यांनी हे अॅप विकसित केले आहे. पुढील वर्षात ते बाजारात येईल.