कलमाडी यांना समाजवादी पक्षाची ‘मदत कराल तर राज्यसभा देवू’ ची ऑफर

पुणे- पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांच्यापुढे समाजवादी पक्षाने ‘महाराष्ट्रातून आमच्या एकदोन जागा निवडून आणू शकला तर राज्यसभेवर पाठवू’ असे आश्वासन दिल्याने कलमाडी उद्या पत्रकार परिषदेत काय भूमिका घेणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातून कलमाडी जर समाजवादी पक्षातर्फे उभे राहिले तर ते निवडून येतील की नाही हा स्वतंत्र मुद्दा आहे पण पुण्यात चार वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या युथ कॉमन वेल्थ गेम पासून ते दिल्लीत झालेल्या कॉमन वेल्थ गेमपर्यंत त्या संदर्भातील राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सारे हिशोब व बेहिशोब लोकांच्या पुढे मांडायची संधी मिळाली तर काँग‘ेसच्या राज्यातील व देशातील अनेक जागा जावू शकतील, असा जाणकांरांचा अंदाज असल्याने सध्या त्यांना चुचकारून घेवूया,असा सल्ला काँग‘ेसच्या नेत्यांना मिळाला आहे. त्यामुळे सध्या तुम्ही लोकसभा निवडणुकीत काँग‘ेसचे उमेद्वार विश्वजित कदम यांना विरोध करू नका किंवा ‘गप्प बसायला काय घ्याल’ असे त्याना सुचविले आहे. गप्प बसाल तर नंतर आरोप पत्र ठेवले जाणार नाही, असे सुचवून बघितले आहे. 

पुण्यातून आपल्याला किंवा पत्नी मीराबाई यांना उमेद्वारी मिळावी म्हणून श्री कलमाडी यांनी कालपर्यत दिल्लीत मुक्काम ठोकून पराकाष्टेचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी ‘कलमाडी व अशोक चव्हाण यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसल्याने पक्षाचे तिकीट मिळणे हा त्यांचा हक्क आहे, अशा स्वरुपाचे विधान पदरात पाडून बघितले पण त्याचाही उपयोग झाला नाही. गेल्या आठवड्यात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंधराव्या लोकसभेचा निरोप समारंभ म्हणून पक्षाच्या सर्व खासदारांत कलमाडी यांना सन्मानाचे निमंत्रण नसताही त्यांनी हजेरी लावली व दोन मिनिटे ‘मॅडम’शी गप्पाही मारून घेतल्या तरीही काही अंतर कापले गेले नाही. 

गेल्या आठवड्यात लखनौ मुक्कामी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांच्या भेटीत त्यांनी त्यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची ‘ऑफर’ दिली. ही ऑफर केवळ पुण्यापुरती नाही तर समाजवादी पक्षाच्या भिवंडी व मुंबईतील एखादी जागा जिंकून देणे त्यांना सहज शक्य आहे. महाराष्ट्र काँग‘ेसमधील कलमाडींचे मित्र जरी त्या त्या ठिकाणी ‘गप्प’ राहिले तरी ते होण्यासारखे आहे, असाच त्या पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा अभिप्राय आहे. त्याच प्रमाणे पुण्यात जर आप, मनसे, युती व काँग‘ेस यांच्या बरोबरीने जर कलमाडी हेही उतरणार असतील तर कलमाडी यांच्या गेल्या बस्तीस वर्षांच्या पुण्याईच्या पार्श्वभूमीवर त्यानी आशा सोडण्याचे काही कारण नाही व जरी पुण्यातील जागा मिळाली नाही तरी उत्तरप्रदेशमधून राज्यसभेवर पाठवू, असेही मुलायमसिंग यांचा शब्द त्यांनी मिळवला आहे. 

कलमाडी हे गेली बत्तीस वर्षे संसदीय राजकारणात आहेत. या काळात त्यांनी काही काळ मंत्रीपदही भूषविले आहे. कार्पोरेट विश्वाशी अनेक व्यवहार करण्यात त्यांचा हातखंडा तर आहेच पण स्वत:चा व्यवसायिक व्याप त्यांनी मोठा वाढवला आहे. पुण्यातील सार्वजनिक जीवनात त्यांनी सुरु केलेले अनेक उपक‘म हे विक‘मी ठरले आहेत. पुणे महापालिकेत त्यांची वीस वर्षांची निरंकूश सत्ता तर होतीच पण आजही पस्तीस नगरसेवकांचा गट त्यांच्या आज्ञेत आहे. राज्यातील व केंद्रातील अनेक काँग‘ेसजन त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंधाने जोडले गेले आहेत. दिल्लीतील भेटीगाठी आवरून ते जेंव्हा आज पुण्यात आले तेंव्हा विमानतळावर त्यांचे वीरोचित स्वागत तर झालेच पण त्यंाची देहबोली ही आक‘मक भूमिका घेणारी होती असेच अनेकांचे निरीक्षण आहे. त्यांच्या निकटवर्तियांच्या माहितीनुसार तो कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर ‘कॉमनवेल्थप्रकरणी ’झालेल्या कारवाईवर उत्तर देण्याची संधी सोडणार नाहीत, अशाच भूमिकेत आहेत. असे समजते.

Leave a Comment