भाजपविरोधात शिवसेना रिंगणात

मुंबई: भारतीय जनता पक्ष  शिवसेना यांच्यातील जागावाटप केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित असल्याचे स्पष्ट करून शिवसेनेने उत्तरप्रदेश सह अन्य राज्यात लोकसभा निवडणूक लढवू; असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार नाही; असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजप  नवनिर्माण सेना यांच्यातील वाढता घरोबा लक्षात घेऊन  भाजपला  धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने देशभर भाजप उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या सहकार्याची विनंती केली होती. राज यांनीही आगामी लोकसभेत मनसेचे खासदार भाजपला पाठींबा देतील. नरेंद्र मोदी  यांना मनसे खासदारांचा पाठींबा असेल; असे जाहीर केले आहे. 

या पार्श्वभूमीवर भाजपचा सर्वात जुना सहकारी असलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात भाजप उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला इतर राज्यात उमेदवार  करण्याचा संपूर्ण अधिकार आहे; असे राऊत यांनी सांगितले. मात्र आमच्या निवडणूक लढविण्याने शक्यतो भाजपचे राजकीय नुकसान होणार नाही; याची आम्ही काळजी घेऊ; असेही ते म्हणाले. 

उत्तर  प्रदेशमधील सेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार असून ती शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. मात्र ठाकरे यांच्या सूचनेनुसार वाराणसी आणि लखनौ येथे उमेदवार उभा केला जाणार नाही; असे उत्तर प्रदेश शिवसेना प्रमुख उदय पांडेय यांनी सांगितले. मात्र उत्तर प्रदेश भाजपवर त्यांनी कठोर टीका केली. भाजपचे नेते येथील शिवसैनिकांना घरगड्यासारखे, वेठबिगारासारखे राबवून घेत असल्याचे ते म्हणाले. शिवसेना उत्तरप्रदेश सह पंजाब, बिहार, केरळ आणि दिल्ली याठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उभे करणार आहे.

Leave a Comment