डोमिनोज मिळेल हाकेच्या अंतरावर

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील पिझ्झा कंपनी डोमिनोज या वर्ष्रअखेर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात जादा आऊटलेट उघडणार आहे. यामुळे डोमिनोजचा स्वादिष्ट आणि विविध चवींचा पिझ्झा भारतीयांना अक्षरशः हाकेच्या अंतरावर मिळू शकणार आहे.

कंपनीचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष रिचर्ड एल्विसन या संदर्भात माहिती देताना म्हणाले की डिसेंबरपूर्वीच भारतातील आऊटलेट संख्या यूकेला मागे टाकणार आहे. युकेत डोमिनोजची ७७० स्टोअर्स आहेत तर भारतात ७०० स्टोअर्स आहेत. भारतात दर महिन्याला १० नवीन स्टोअर्स उघडली जाणार आहेत.

जगभरातील ७० पेक्षा अधिक देशांत डोमिनोजची ५९०० स्टोअर्स असून जग मंदीच्या विळख्यात होते तेव्हाही डोमिनोजचा व्यवसाय वाढलाच होता आणि नवीन स्टोअर्स उघडली जातच होती असेही रिचर्ड यांनी सांगितले. डोमिनोज व्यवसाय वाढीसाठी सप्लाय चेन व प्रशिक्षण यात अधिक गुंतवणूक करत आहे. प्रशिक्षणात दुप्पट वाढ केली जात आहे कारण त्यामुळे स्टोअर्स वाढली की पिझ्झाची मागणी पुरविण्यात अडचण येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment