शक्ती मिल बलात्कार प्रकरणात चारही आरोपी दोषी

मुंबई- काही दिवसापूर्वी शक्ती मिल परिसरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात चारही आरोपी ना कोर्टाने दोषी ठरविले आहे. मुंबई सत्र न्यायालय शुक्रवारी त्यांना शिक्षा सुनावणार आहे. विजय जाधव, कासीम बंगाल, सिराज रेहमान, सलीम अन्सारी असं या चारही आरोपींची नावं आहेत. कोर्ट त्यांाना काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शक्ती मिल परिसरात एका महिला पत्रकारावर २२ ऑगस्ट २०१३ रोजी सामूहिक बलात्कार केला गेला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका टेलिफोन ऑपरेटर महिलेनंही ३१ जुलै २०१३ रोजी हाच प्रसंग आपल्यावरही ओढावल्याचं उघड केलं होतं. या दोन्ही प्रकरणांत या प्रकरणातील चारही सज्ञान आरोपी दोषी ठरलेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणि निकाल ऐकण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटीलदेखील मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित झाले होते.

सहा महिने चाललेल्या या खटल्यात एकूण पाच आरोपी आहेत, त्यातला एक जण अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आरोपी वगळता उरलेल्या चार जणांना आता शिक्षा सुनावली जाणार आहे.
दिल्लीत निर्भयावर झालेला अत्याचार आणि मुंबईत शक्तीमिल कंपाऊंडमध्ये झालेला गँगरेप या दोन घटनांनी भारतात महिला सुरक्षित नाहीत हे अधोरेखित केले. मुंबई क्राईम ब्रँचने तातडीने तपास करत आरोपींना गजाआड केलं आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. सहा महिन्यांच्या आत खटला पूर्ण करून न्यायालय आता अंतिम निकाल देणार आहे.