वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावितांची मंत्रीपदावरून हकालपट्टी

मुंबई  – भाजपने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिल्यामुळे, त्यांचे ​वडील व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कळविल्यावर त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली.  

अजित पवार यांच्या इशाऱ्याला धूप न घालता डॉ. गावित यांची कन्या हीना यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश घेऊन नंदुरबार लोकसभेसाठी भाजपचे तिकीट पदरात पाडून घेतले. त्यानंतरही त्यांचे ​वडील डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नव्हता. त्यांच्या प्रति​क्रियेसाठी सुरूची निवासस्थानी अनेकदा संपर्क साधूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Leave a Comment