सायबर गुन्हे रोखण्यासाठी ५०० अब्ज डॉलर्स खर्च

आयटीसी आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांनी एकत्र येऊन केलेल्या पाहणीत यंदाच्या वर्षात सायबर गुन्हे रोखणे आणि मालवेअरचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील उद्योगांना किमान ५०० अब्ज डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेनदिवस वाढत चालले असून हॅकर युजरची वैयत्ति*क माहिती, डेटा, चोरण्यात तसेच मालवेअर घुसविण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढत असल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सुरक्षा तज्ञांचे मत आहे.

जगभरातील उद्योगांना मालवेअर निपटण्यासाठी १२७ अब्ज तर डेटा चोरी प्रतिबंधासाठी ३६४ अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतील शिवाय कामाचे कित्येक तास वाया जातील ते वेगळे असे या अभ्यास पाहणीतून निष्प्पन्न झाले आहे. त्याचवेळी सायबर सुरक्षेतील धोके आणि मालवेअर, पायरेटेड सॉफ्टवेअरमुळे नुकसान झालेल्या संगणकांची दुरूस्ती करण्यासाठी  जगभरातील युजरना २५ अब्ज डॉलर्स खर्ची टाकावे लागतील असेही दिसून आले आहे. विशेष म्हणजे उद्योगजगतात पायरेटेड सॉफटवेअर तेथील कर्मचारीच अधिक प्रमाणात लोड करत असतात असेही आढळले आहे.

दोषपूर्ण सॉफटवेअरमुळे वैयक्तीक माहिती , डेटा, फाईल चोरीस जाण्याची भीती ६० टक्के युजरना सतावते आहे आणि त्यातही बँक अकौंट हॅक होऊन नुकसान सोसावे लागेल अशी भीती सर्वाधिक युजरना वाटते असेही या पाहणीत आढळले आहे.

Leave a Comment