दक्षिण आफ्रिकेत पुरामुळे ३२ ठार

जोहान्सबर्ग – तुफानी पावसाने दक्षिण आफ्रिकेतील बहुतेक भागाला झोडपले असून पावसामुळे आलेल्या पुरात ३२ जण ठार झाले आहेत तर ३ हजार लोकांना अन्य स्थळी हलविले गेले आहे. मंत्री अँर्डीज नेल यांनी दिलेल्या माहितीनुमार २५ नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे तर अन्य ७ जणांना विजेच्या धक्क्यामुळे मरण आले आहे.

लिम्पोपो जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून येथून ३ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविले गेले आहे. घरातून , गाड्यांमधून अडकलेल्या लोकांना वाचविण्यात आले असले तरी अनेक घरांत, रस्त्यांवर अजून पाणी आहे. पुल, घरे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच पाणी पंप आणि पाईपलाईनमध्येही दोष निर्माण झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे मात्र अजूनही कांही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.