डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेत

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात ओळखले जाणारे अमोल कोल्हे मावळमधुन मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी मनसेचे तिकीट नाकारत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

उध्दव ठाकरेंचे नेतृत्व आक्रमक आणि संयमी आहे म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे कोल्हे यांनी पक्ष प्रवेशाच्यावेळी सांगितले. मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कोल्हे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकारपरिषदेत उध्दव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देत आहे. शिवसेनेत मोठे झालेल्यांना राष्ट्रवादी उमेदवारी देत आहे अशी टीका त्यांनी केली.

Leave a Comment