मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कपिल पाटील यांनी गोपीनाथ मुंडे, देव्रेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला रामराम करून भाजपत प्रवेश केला आहे. त्यांना भिवंडी मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल असे सांगितले जात आहे.
पाटील ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत. शिवसेनेच्या राहुल नार्वेकर यांनी सेनेला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर लगेचच कपिल पाटील यांनी भाजपची वाट धरली आहे. यापूर्वी सांगलीतून आमदार संजय पाटील यांनीही राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला असून त्यांनाही लोकसभेची उमेदवारी दिली गेली आहे