राज्यात उन्हाचे चटके जाणवू लागले

मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून म्ह्णजेच होळीचा उत्सव झाल्यानंतर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपासून राज्यात मुंबईसह सर्वत्र उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मुंबईत सोमवारचे तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे सर्वत्र उन्हाळा जाणवत होता.

राज्यात होळी पार पडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही झाल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. मात्र आगामी काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याचमुळे येत्या काळात उष्णातेत वाढ होणार असे दिसत आहे.

यावर्षी मार्च महिना सुरु झाला तरी म्हणावे तसा उन्हाळा जाणवत नव्हता. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र वातावरणता बदल झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी थंडी जाणवत होती. महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा सुरु झाल्यानंतर लगेचच तापमानाने ३८ अंशाची मजल गाठली आहे.
त्यामुळे आगामी काळात म्हजेच एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी किती वाढणार याची धाकधुक सगळ्यांना लागून राहिली आहे.

Leave a Comment