… तर, हकालपट्टी’, डॉ.गावितांना अजितदादांचा इशारा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुस-या पक्षात जाण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. शिवसेनेचे अभिजीत पानसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्यानंतर, त्यापाठोपाठ शिवसेना आणि युवासेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी प्रवेश केला आहे. आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या मुलीला लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यावर अतिशय नाराज आहेत. त्यांनी आज (सोमवार) राहुल नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गावित यांनी भाजपकडूून मुलीला उमेदावारी मिळवून दिली तर, त्यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त करण्याचा इशारा दिला आहे. 

 डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारले असता त्यांनी डॉ. गावित यांना कडक इशारा दिला आहे. त्यांच्या मुलीने भाजपच्या तिकीटावर उमेदवारी दाखल केली त्या क्षणाला त्यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त करण्याचे पत्र देण्यात येईल, असे पवार म्हणाले.  डॉ. गावित यांचे कन्या हिना यांना भाजपमधून लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप त्यांना काँग्रेसच खासदार माणिकराव गावित यांच्या विरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. याबद्दल आज (सोमवार) उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारले असता त्यांनी डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपची उमेदवारी घेऊ नये असे म्हटले आहे. त्यानंतरही त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभेसाठी अर्ज दाखल केला तर, त्या क्षणालाच पक्षाचा विधिमंडळ नेता या नात्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉ. गावित यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त करण्याचे सांगण्यात येईल, असे ते म्हणाले.  

पवारांच्या या कडक इशा-याने ते डॉ. गावितांवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. गावितांना मंत्रिमंडळातून बर्खास्त करण्याचा इशारा देतानाच, ते असे करणार नसल्याचा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  मुलगी हिना यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असेलले डॉ. गावित देखील राज्यातील भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीला दिंडोरीत फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment