अब्जाधीशाने उतरविला १२०० कोटींचा विमा

सिलिकॉन व्हॅलीतील एका अब्जाधीशाने स्वतःचा १२०० कोटी रूपयांचा विमा उतरविला आहे. जगातील आजपर्यंतच्या विमा रकमेत हा सर्वाधिक रकमेचा विमा असल्याचे सांगितले जात आहे. या अब्जाधीशाने आपले नांव गुप्त ठेवले आहे. त्याचे कारण मात्र मजेशीर आहे. इतक्या मोठ्या रकमेचा विमा उतरविल्याचे समजले तर त्याचे वारस कामधंदा सोडतील आणि आळशी बनतील म्हणून नांव जाहीर करण्यास त्याने मनाई केली आहे.

यापूर्वी हॉलीवूडच्या डेव्हिड गिफन याने १९५० मध्ये  १० कोटी डॉलर्सचा विमा उतरविला होता. आजच्या दराने त्याची किमत होते ६५० कोटी. त्यावेळी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये केली गेली होती. भारतीय बॉलीवड जगताचा शहनशहा अमिताभ बच्चन याचाही अभिषेक बच्चनने १५० कोटी रूपयांचा विमा १९९६ साली केला होता. भारतातील विम्याची ही सर्वाधिक रक्कम होती आणि त्याबद्दल अभिषेकला ३० कोटी रूपयांचे कमिशनही दिले गेले होते.

या अज्ञात अब्जाधीशाचा विमा फ्रान्सिस या विमा एजंटाने उतरविला आहे. फ्रान्सिस सतत ७ महिने त्यासाठी पाठपुरावा करत होता आणि २०१० पासून तो या अब्जाधीशासोबत आहे. मात्र कोणतीच विमा कंपनी इतक्या मोठ्या रकमेचा विमा घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे १९ कंपन्यांनी मिळून हे डिल फायनल केले असल्याचेही समजते.

Leave a Comment