सौदीत राम नांव ठेवण्यास बंदी

सौदी सरकारने मुलामुलींची राम, माया, मल्लिका सह अन्य ५० नांवे ठेवण्यास कायद्याने बंदी केली आहे. सौदीच्या गृहमंत्रालयाने त्या संदर्भातली सूचना जारी केली असून भारतात लोकप्रिय असलेल्या नावांबरोबरच परदेशी लिंडा, एलिसा, र्लौरेन अशी नांवेही पालक मुलांना ठेवू शकणार नाहीत. ही नांवे देशाच्या संस्कृतीला अनुरूप नाहीत तसेच ती देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनेला ठेच लावणारी आहेत असेही सरकारचे म्हणणे आहे.

ज्या नावांवर बंदी घातली गेली आहे ती धार्मिक भावनांची सूचक अथवा राजपरिवाराशी संबंधित आहेत तशीच ती मूळ इस्लामी नाहीत असे सरकारचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सौदीत बेन्यामिन या नावावरही बंदी घातली गेली आहे. बेंन्यामिन हे बेंजामिन या नावाचे अरबी संस्करण आहे मात्र ते इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे नांव असल्याने त्यावरही बंदी घातली गेली आहे.