मोदींविरोधात कोण तसेच कलमाडीं विषयी आज निर्णय

दिल्ली – लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी नक्की करण्यासंदर्भात काँग्रेस निवडणूक समितीची बैठक आज होत असून त्यात वाराणसीतून काँगेस मोदींविरोधात उमेदवार निश्चत करणार आहे तसेच पुण्याच्या जागेसाठी कलमाडीना संधी मिळणार वा कसे याचाही निर्णय आज घेतला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मोदींविरोधात काँग्रेस कुणाला उतरविणार याची सार्‍या देशभर उत्सुकता आहे. काँग्रेस आजच्या बैठकीत १०० उमेदवारांची यादी निश्चित करणार असून त्यात प.बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे. पुण्यातून सुरेश कलमाडी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली असून त्याचा निर्णयही आजच्या सभेत घेतला जाणार आहे. तसेच मनीष तिवारी यांनी निवडणूक न लढविण्याचा इरादा व्यक्त केल्यानंतर त्यासंदर्भातला अंतिम निर्णयही आजच होईल असे सांगितले जात आहे.

दरम्यान येत्या २५ मार्च रोजी नरेंद्र मोदी वाराणसीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही वृत्त आहे.