दोन सेकंदात चित्रपट डाऊनलोड

दिल्ली- भारतात लवकरच सुरू होत असलेल्या ५ जी सेवेमुळे आख्खा चित्रपट अवघ्या दोन सेकंदात डाऊनलोड करता येणार आहे. अक्षरशः चुटकी वाजविण्यास जितका वेळ लागतो, तेवढ्याच वेळात चित्रपट डाऊनलोड होऊ शकणार आहे. फाइव्ह जी च्या तंत्रज्ञानामुळे ८०० एमबी पर्यंतची कोणतीही फाईल केवळ १ सेकंदात डाऊनलोड होऊ शकणार आहे.

भारतात सध्या थ्रीजी आणि फोरजी सेवा उपलब्ध आहेत. ८०० एमबीची फाईल फोर जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डाऊनलोड करायला ४० सेकंद लागतात याचाच अर्थ फाइव्ह जी सेवा फोरजी च्या तुलनेत ४० पट अधिक वेगवान आहे. सर्वसाधारण हिंदी चित्रपट १५०० एमबीचे असतात. थ्रीजी सेवेच्या सहाय्याने या लांबीचा चित्रपट डाऊनलोड करायला ८० सेकंद लागतात असे समजते.

1 thought on “दोन सेकंदात चित्रपट डाऊनलोड”

Leave a Comment