कुमार संगकारा टी-२० मधून निवृत्त होणार ; जयवर्धेनेचीही टी२० मधून निवृत्तीची घोषणा

कोलंबो – श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटपटू कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार आहे. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या टी२०विश्वचषक स्पर्धेनंतर संगकारा निवृत्त होणार आहे. हा संगकाराचा शेवटचा टी२०विश्वचषक आहे मात्र विविध देशांत होणा-या टी२० स्पर्धांमध्ये तो सहभागी होणार असल्याचे संगकाराने सांगितले. संगकारा आतापर्यंत ५० टी२० सामने खेळला आहे. त्याने आतापर्यंत १३११ धावा केल्या आहेत. २०१२ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात त्याने श्रीलंकन संघाचे कर्णधार पद सांभाळले होते. त्यावेळी श्रीलंकेने अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीक श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला होता.

कुमार संगकाराने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यापाठोपाठ श्रीलंकेचा फलंदाज महेला जयवर्धनेनेही आपण आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषकानंतर महेला निवृत्ती घेणार आहे. यावर्षीचा टी२० विश्वचषक हा दोन्ही खेळा़डूंसाठी शेवटचा विश्वचषक आहे. आयसीसीने ट्विटरद्वारे जयवर्धनेचा निर्णय जाहीर केला. रविवारीच श्रीलंकेच्या कुमार संगकाराने आपण आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. जयवर्धेने आतापर्य़ंत ४९ टी२० सामने खेळले असून १३३५ धावा केल्या आहेत. २०१०च्या विश्वचषकात त्याने झिंम्ब्वावेविरुद्ध शतकी खेळी केली होती.

Leave a Comment