राज ठाकरेनी केले आचरसहिंतेचे उल्लंघन

बीड : आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बीड दौर-यात आचरसहिंतेचे उल्लंघन केल्याने ते अडचणीत आले आहेत. राज ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत दिली असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तातडीने पाठविला आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह़यातील वडवणी तालुक्यातील पिंपरखेडला राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या सत्यभामा कानडे यांच्या कुटुंबियांस ५0 हजार रुपयांची मदत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदर्श आचारसंहितेमधील तरतुदींचे या प्रकरणामध्ये उल्लंघन झाले असल्यास आयोगाच्या सूचनेनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हे रेल्वे विकासासाठी शासनाने निधी मंजूर केला असल्याबाबत बोलल्याचे वृत्त विविध दैनिकांतून प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक विभागाने याची तात्काळ दखल घेऊन प्राथमिक चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये सदरहू शासन निर्णय झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने तसा अहवाल मुख्य निवडणूक अधिका-याकडे पाठविण्यात आला असून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोणतीही नवीन घोषणा केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यासमुळे आता निवडणूक आयोग यांच्याेवरआता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.