
मॉस्को- युक्रेनच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या क्रिमिया या प्रांतातील ९७ टक्के लोकांनी युक्रेनमधून बाहेर पडून रशियात विलिन करण्याला मान्यता दिली आहे. युक्रेनमध्ये राहायचे की रशियामध्ये सहभागी व्हायचे या प्रश्नावर रविवारी सार्वमत घेण्यात आले होते. या सार्वमतामध्ये ९७ टक्के जनतेने रशियामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या सार्वमातवर युक्रेनसह, अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सार्वमत अवैध असल्याचे युक्रेन आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांनी सांगितले आहे.
