बांग्लादेशमध्ये टी २० वर्ल्डकपचा थरार सुरु

ढाका- बांग्लादेशमध्ये रविवारपासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. बांग्लादेशमध्ये होत असलेल्या या वर्ल्डकपमध्ये रविवारपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु झाल्यार आहेत. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होत आहे.

बांग्लादेशमध्ये टी-२० वर्ल्डकपला मुख्य स्पर्धेला २१ मार्चपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीने सुरुवात होणार आहे. गेल्या चार टी-२० वर्ल्ड कपमध्ये चार नवे चॅम्पियन क्रिकेटविश्वाला मिळाले आहेत. त्यामुळे नेमकी कुठली टीम सरस ठरणार हे सांगणं आताच कठीण आहे.

बांग्लादेशमध्ये होत असलेल्या टी-२० महासंग्रामात क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळतो की, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी कोणती टीम बाजी मारते ते पाहणे आता आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींचे याकडे लक्ष लागून रहिले आहे.

Leave a Comment