मासाहारी भोजन १५० रु.चहासाठी ५ रु.

मुंबई – लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना ७० लाख रूपये खर्चाची सीमा घालून दिली आहेच पण त्याचबरोबर प्रचारासाठी किती खर्च करता येईल याची आकडेवारीही जाहीर केली आहे. उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी बँक खाते खोलणे अनिवार्य केले असून बँकेच्या माध्यमातून दररोजचा खर्च आयोगाला द्यायचा आहे.

या यादीनुसार उमेदवार कार्यकर्त्यांसाठी दररोज मांसाहारी जेवण असेल तर १५० रूपये, शाकाहारी जेवण ७५ रूपये. चहा ५ रूपये, कॉफी १० रूपये, नाश्ता २५ रूपये, कोल्ड ड्रिंक १५ रूपये, लस्सी २५ रूपये खर्च करू शकणार आहेत. यापेक्षा अधिक खर्च केल्यास ते आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाणार आहे.

मांडवासाठी २२५ रूपये रोज, टाटा सुमो इंधनासाठी २३७५ रूपये, मिनी बस साठी ३५०० रूपये, ट्रकसाठी ३५५० रूपये, अॅबॅसिडर एसी साठी ४२५० रूपये तर नॉनएसी साठी २५०० रूपये  खर्च करू शकणार आहेत. बेडशीट, स्टेज, होर्डिंग, बॅनर यासाठीही खर्चाची मर्यादा ठरवून दिली गेली असून हा हिशोब रोजचा रोज द्यावा लागणार आहे.

Leave a Comment