प्रशिक्षकपद आताच नको- राहूल द्रवीड

मुंबईः टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक डंकन फ्लेचरकडून या पदाची धुरा राहुल द्रविडकडे सोपवले जावे असे मत माजी कर्णधार व धुरंधर फलंदाज सुनील गावस्करने व्यक्त केले होते. पण आताच टीम इंडियाचे प्रशिक्षक पदाची धुरा संभाळण्यास माजी कर्णधार राहूल द्रवीडने नकार दर्शविला आहे. वेळेअभावी मला या पदाची जबाबदारी स्वीकारता येणार नाही असे द्रविडने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक डंकन फलेचर यांना बदलण्यालत यावे असा सुर अनेकांनी व्यीक्ता केला होता. त्यामुळे राहूल द्रवीडचे नाव प्रशिक्षक पदासाठी आघाडीवर होते. याबाबत बोलताना राहूल द्रवीड म्हाणाला, सुनील गावस्करसाऱख्या बुजुर्ग कर्णधाराने मला प्रशिक्षकपदाच्या योग्यतेचे मानले यामुळे मला आनंद झाला. परंतु, प्रशिक्षकाच्याा संघासाठी भरपूर वेळ खर्ची घालावा लागतो. वर्षातील जवळपास ११ महिने तो संघाबरोबर असतो त्यातच मी अलीकडेच निवृत्त झालो आहे. अन् सध्या तरी वेळेच्या बंधनामुळे मला ही जबाबदारी स्वीकारता येणार नाही. यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सल्लागार-मदतनीसाच्या भूमिकेत असून भविष्यात काय दडलंय ते मला ठाऊक नाही असे द्रविडने सांगितले.

टीम इंडियाचे प्रशिक्षकपद नौजवान खेळाडूकडे सोपवायला हवे असे मत गावस्करने अलीकडेच मांडले होते. द्रविडबाबत सर्वांच्या मनात आदराची भावना असून तो यशस्वी संघनायक होता. विंडीज, इंग्लंडमधील कसोटी मालिका भारताने द्रविडच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. भारतीय संघातील सुपरस्टार्सदेखील त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात कारण आपल्या खेळावर त्याने किती मेहनत केली आहे हे या सुपरस्टार्सना ठाऊक आहे याचाही गावस्करने खास उल्लेख केला.