पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने शुक्रवारी देशद्रेहाच्या खटल्यात माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ३१ मार्चपर्यंत मुशर्रफ कोर्टात हजर झाले नाहीत तर त्यांना अटक करण्यात यावी असा आदेश आज कोर्टाने दिला. माजी लष्करशहा मुशर्रफ पुन्हा एकदा आज कोर्टासमोर आले नाही.
मुशर्रफ यांच्या वकीलांनी सुनावणीला हजर राहाण्यापासून सुट देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने मुशर्रफ यांच्याविरोधातील निर्णय दुपारपर्यंत राखून ठेवला होता. पाकिस्तानात 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्याप्रकरणी तसेच पाकची राज्यघटना बरखास्त केल्याप्रकरणी परवेझ यांच्यावर देशद्रेहाचा खटला चालवण्यात येत आहे. पाकमधील निवडणुकीआधी परवेझ मुशर्रफ मायदेशी परतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अनेक महिने ते तुरुंगातच होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.