मोटो जीच्या यशानंतर स्मार्टफोन मेकर कंपनी मोटोरोलाने मोटो एक्स भारतात कंपनीचे पार्टनर फ्लीप कार्ट कंपनीतर्फे ऑनलाईन विक्रीतून उपलब्ध करून दिला आहे. फ्लिपकार्टने त्याची जाहिरात वेबसाईटवर सुरू केली असून हा फोन अमेरिकेत ऑगस्टमध्येच लाँच करण्यात आला आहे.
या फोनचे वैशिष्ठ्य म्हणजे ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार फोनची बॉडी, रंग, डिझाईन, फोनच्या मागे स्वतःची सही अशा अनेक बाबी निवडता येणार आहेत.मोटो मेकर ही सेवा त्यासाठी ग्राहकाला उपलब्ध करून दिली आहे. या मार्फत वेगवेगळी २ हजार कॉम्बिनेशन युजर आपल्या फोनसाठी करू शकणार आहे. सध्या ही सेवा फक्त अमेरिकेतच उपलब्ध असून भारतीय युजरना ही सेवा उपलब्ध नाही. भारतीय युजर काळा, पांढरा, वूड फिनिश, निळा या रंगातच फोनची निवड करू शकणार आहेत. या फोनची किमत आहे २५००० रूपये.
ड्युअल कोअर स्नॅन ड्रॅगन प्रोसेसर, ४.७ इंची स्क्रीन, अॅड्राईड किटकॅट, १६ व ३२ जीबी मेमरी, १० मेगापिक्सलचा कॅमेरा अशी या फोनची अन्य वैशिष्ट्ये आहेत.