ब्रिटनमधील केवळ चार वर्षाचा मुलगा बर्नश्ले शेर्विन याचा आयक्यू जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व संशोधक अल्बर्ट आईनस्टाईनइतका म्हणजे १६० असल्याचे आढळून आले असून त्याची नोंद ८५ जिनिअस लोकांमध्ये करण्यात आली आहे. हेलिक ही संस्था अशा अतिउच्च आयक्यू असणार्या लोकांची जिनिअस म्हणून नोंद करते. शेर्विन दक्षिण यार्कशायर परगण्याचा रहिवासी आहे.
शेर्विन हा अत्यंत हुषार आहेच पण केवळ तिसर्या वर्षातच तो शाळेत दाखल झाला तेव्हाच त्याला असंख्य शब्द आणि पाढे येत होते. त्याची आई सांगते, तो वयाच्या मानाने खूपच हुषार आहेच पण वेगवेगळे प्रश्न विचारून आम्हाला हैराणही करत असतो. त्याचा शब्दकोशही खूपच मोठा आहे. जगातील जिनिअस लोकांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येच्या केवळ ०.००३ टक्के इतकेच असते व त्यात शेर्विन सामील झाला आहे.
विशेष म्हणजे आईनस्टाईनचा आयक्यू कधीच काढला गेला नव्हता मात्र तो १६० पेक्षा अधिक असावा असे मानले जाते.