स्मार्टफोन देणार आजाराची माहिती

आजारपण आले की नक्की आपल्याला काय होतेय हे समजण्यासाठी डॉक्टरची भेट घेण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता तुम्हाला काय झालेय याची माहिती तुमचा स्मार्टफोनच देऊ शकणार आहे. ह्यूस्टन विद्यापीठातील जिमिंग बाओ आणि रिचर्ड विल्सन यांनी बनविलेल्या डिसीज डायग्नोटिक सिस्टीममुळे स्मार्टफोन आणि यूएसडी २० लेन्सच्या सहाय्याने हा चमत्कार घडविला आहे.

आत्तापर्यंत स्मार्टफोनचा वापर दिशा दाखविणे, फोटो काढणे, व्हिडीओ पाठविणे या कामांसाठी होत होताच त्यात आता आजार सांगण्याच्या कामाची भर पडणार आहे. नवीन अन्य डायग्नोटिक टूल प्रमाणेच हे उपकरण आजार ओळखणार आहे. आजार येताना व्हायरस आणि बॅक्टेरिया यांच्यात कांही रासायनिक क्रिया घडतात त्यावरून आजार ओळखता येतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या उपकरणात बाओ आणि विल्सन यांनी ग्लास स्लाईड आणि सोन्याच्या सच्छीद्र पत्र्याचा वापर केला आहे. या पत्र्यातून आत जाणारया सूर्यकिरणांच्या मदतीने अगोदरच उपस्थित असलेल्या अँटीबॉडीज व स्लाईडवर घेतलेले सॅपल यातून सॅपलमधील बॅक्टेरिया यांच्यात बाँडिग तयार होते. या अँटीबॉडिज सिल्व्हर पार्टिकल्स तयार करतात.१५ मिनीटांनी ही स्लाईड धुतल्यानंतर आजाराचे स्वरूप कळू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही