मायग्रेनला पळवून लावेल हा हेडबँड

मायग्रेन म्हणजे बारीक डोकेदुखीचा त्रास जगभरात अनेक लोकांना सातत्याने होत असतो. त्यावर उपाय म्हणून सेफली नावाने एक हेडबँड तयार करण्यात आला असून हा बँड डोक्यावर बांधला असता मायग्रेनचे दुखणे थांबते असा कंपनीचा दावा आहे. या बँडला फूड अॅन्ड ड्रग विभागाकडून नुकतीच मान्यता दिली गेली आहे.

हा बँड मायग्रेनचा त्रास होत असताना डोक्यावर बांधला की त्यातून डोक्यात करंट सोडला जातो. हा बँड बॅटरीवर चालतो व यातून जाणार्‍या करंट मुळे डोक्यात कांहीवेळा गुदगुल्या झाल्याची भावना होते. या बँडमुळे नर्व्हज स्टीम्युलेटिंग केले जाते आणि त्यामुळे डोकेदुखी थांबते. अर्थात हा बँड मायग्रेनचा आजार बरा करत नाही तर मायग्रेनच्या अॅटॅकची तीव्रता कमी करण्यास मदत करतो. या बँडच्या चाचण्या २३१३ लोकांवर घेतल्या गेल्या असून ते या बँडमुळे संतुष्ट आहेत असेही सांगितले जात आहे.

हा बँड १८ वर्षाच्या पुढील लोकांनीच वापरायचा असून सध्या तो अमेरिका आणि कॅनडात उपलब्ध आहे. त्याची किंमत आहे २४९.९९ डॉलर्स म्हणजे साधारण १५ हजार रूपये. सेफली टेक्नॉलॉजीने हा बँड तयार केला आहे.