थोड्या थोड्या गारपिटीची शक्यता अजून एक आठवडा

पुणे: आग्नेयेकडून महाराष्ट्रात येणारे पावसाच्या ढगांचे प्रवाह आणि उत्तरेकडून येणारे गार वारे यामुळे  गेले पंधरा दिवस महाराष्ट्राला त्रस्त करीत असलेल्या गारपिटीची शक्यता अजून संपलेली नाही, असे तज्ञांचे मत आहे. त्याची तीव्रता तेवढी असणार नाही, व तो राज्यभरही पडणार नाही तरीही तो धोका अजून संपलेला नाही, असे मत असे मान्सून तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी बोलून दाखविले आहे. ते म्हणाले, पंधरा दिवसापूर्वी हिंदी महासागरात पावसाची क्षमता असलेली ढगांची सिस्टिम विकसित झाली र्तेव्हाच माझी ‘ही तर मोसमी पावसासारखी स्थितीम अशी प्रतिक्रिया झाली होती. गेले पंधरा दिवस त्याचाच परिणाम दिसतो आहे. आणि हिदंीमहासागर व अरबी समुद्र या भागातील निर्माण झालेली परिस्थिती आता ईशान्येकडे सरकताना दिसते आहे. त्याच बरोबर सह्याद्रीपासून ते विदर्भापर्यंत जोराची एक सिस्टिम निर्माण झाली आहे. हा पाउस जरी मान्सूनसारखा नसला तरी किरकोळ स्वरुपाचा असेल  व ती स्थिती पुढील आठ दिवस असेल, असे वाटू लागले आहे. 

याच वेळी उत्तरेत काश्मिरात बफर्ं वृष्टी होत आहे आणि त्याचे वारेही दक्षिणेकडे सरकताना दिसत आहेत या वार्‍यात कधी शीत आर्द्र क्षमता असते तर कधी नसते. त्यामुळे या काळात काही भागात थोड्या स्वरुपात गारा पडतील, असे वाटते,असेही डॉ साबळे यांनी बोलून दाखविले आहे.