आयपीएलचे सामने आता तीन टप्यात

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या आयपीएल-७ च्या यजमानपदाचा गोंधळ संपला आहे. त्यामुळे आता आयपीएल क्रिकेट स्पर्धाही मतदानाप्रमाणेच तीन टप्प्यात घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यामुळे आगामी काळात आयपीएल-७ ही स्पर्धा एकूण तीन टप्प्यांत यंदा होईल.

या स्पर्धेचा पहिला टप्पा संयुक्तअरब-अमिरातीमध्ये (दुबई, शारजा, अबुधाबी) १६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत होईल. दुसरा टप्पा भारतातच मतदान झालेल्या राज्यांमध्ये सरकारची परवानगी मिळाल्यास होईल अथवा त्या टप्प्यातील सामने बांगलादेशात घेण्यात येतील. दुसरा टप्पा १ मे ते १२ मे या कालावधीत होईल आणि तिसरा व अखेरचा निर्णायक टप्पा १३ मे रोजी देशातील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार परवानगी देईल त्या तारखेपासून १ जूनपर्यंत भारतात होईल.

या तीन तुकड्यांमध्ये सातव्या आयपीएल स्पर्धेची घोषणा करून बीसीसीआयने सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम दिला आहे. २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेने आयपीएलचे आयोजन केले होते. देशांतर्गत निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत होणार आहेत. त्यारम्यान आयपीएल सामन्यांना सुरक्षा व्यवस्था देता येणार नाही, असे गृहमंत्रालयाने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितल्याने अन्य पर्यायांचा शोध बीसीसीआयने सुरू केला होता. आता ही स्पर्धा तीन टप्पयात होणार आहे.

Leave a Comment