डाटास्टीकीज- डेटा ट्रान्स्फरसाठी नवी सुविधा

संगणकातून डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी आजपर्यंत यूएसबीची गरज यापुढे भासणार नाही कारण डाटास्टीकीज नावाचे अगदी सुटसुटीत आणि सहज वापरण्यासारखे नवे उपकरण हे काम करू शकणार आहे. विशेष म्हणजे अदितीसिंग आणि पंकज आनंद या तज्ञांनी हे उपकरण तयार केले असून ते लवकरच बाजारात उपलब्ध होत आहे.

या स्टीकीज नावाप्रमाणेच संगणक, स्मार्टफोन, टॅब्लेट, टिव्हीवर केवळ चिकटवायच्या आहेत. ग्रेफेन या मेटेयियलपासून त्या तयार केल्या आहेत. त्यांची क्षमता ३२ जीबी इतकी आहे आणि विविध आकार आणि रंगात त्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्या चिकटविण्यासाठी खास पदार्थ लावावा लागतो मात्र या पदार्थाच्या कोणत्याही खुणा स्क्रिनवर राहात नाहीत असे समजते. या स्टिक एकावर एक अशाही चिकटविता येतात.

डेटा ट्रान्स्फरसाठी आतापर्यंत युएसबीचा वापर होत होता मात्र कांही उपकरणांना त्यासाठीआवश्यक असलेला यूएसबी ड्राईव्ह नसतो. नव्या उपकरणामुळे यूएसबीची गरजच संपेल असे सांगितले जात आहे. या स्टीकवर कांही लिहायचे असेल तर लिहिता येते तसेच या स्क्रीनवर चिकटवायच्या असल्याने पेन ड्राईव्ह प्रमाणे त्या हरविण्याचाही धोका नाही असाही संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment