सचिनचे २०० ग्रॅमचे चांदीचे नाणे येणार

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे चित्र, सही , नाव आणि २०० कसोटी अशी चिन्हे असलेली चांदीची नाणी येत्या १४ मार्चला बाजारात आणली जात आहेत. ही नाणी २०० ग्रॅम वजनाची आहेत. व्हॅल्यूमार्ट गोल्ड अॅन्ड ज्युवेल अॅन्ड डायमंड इंडियाने अशी १५९२१ नाणी बाजारात आणण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. हा आकडा म्हणजे सचिनने १९८९ ते २०१३ या २४ वर्षात खेळलेल्या कसोटी सामन्यातील रन्सची संख्या आहे.

सचिनची प्रतिमा असलेली चांदीची १० व २० ग्रॅमची चांदीची नाणी यापूर्वीच बाजारात आलेली आहेत. मात्र त्यावर २०० कसोटी असा उल्लेख नाही. ही नाणी स्वित्झर्लंडमधील वॉलकाँबी या कंपनीकडून तयार करून घेण्यात आली आहेत असे समजते.

Leave a Comment