टी-२०विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार

मुंबई- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला बांगलादेशात १६ मार्चपासून सुरूवात होत आहे. आगामी काळात होत असलेल्या हा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य टीम इंडियाने ठेवले असून या दौ-याची तयारी सध्या खेळाडू करीत आहेत. टी-२०विश्वचषक स्पार्धेसाठी टीम इंडिया बांगलादेशला शुक्रवारी रवाना होणार आहे.

आयसीसी टी-२०विश्वचषक स्पर्धेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. आशिया चषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आगामी काळात आता आशिया चषकातील अपयश दूर सारून स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. या स्पर्धेत पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत २१ मार्च रोजी टीम इंडियाचा सामना रंगणार आहे.

त्यापूर्वी टीम इंडिया १७ मार्चला श्रीलंका आणि १९ मार्चला इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. गेल्याट काही सामन्या्त सलग पराभवामुळे आता टी-२० मध्ये विजयाचे आव्हान टीम इंडिया पुढे असणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आगामी काळात होत असलेल्या टी-२० सामन्याकडे लागले आहे.

Leave a Comment