भारतातील कार उत्पादनातील अग्रणी असलेल्या मारूती सुझुकीने वॅगन आर, अल्टो आणि के १० ही मॉडेल्स अॅटोमॅटिक गिअर बॉक्ससह बाजारात आणण्याचा विचार चालविला असून नवीन मॉडेल सियाज हिलाही सीव्हीटी गिअर बॉक्स बसविल्या जाणार आहेत असे समजते.

अल्टो, वॅगन आरला बसविण्यात येणार्या अॅटोमॅटिक गिअर बॉक्समुळे या गाड्या ह्युंडाईच्या इऑन, शेव्हरोलेटच्या स्पार्क आणि डस्टनच्या आगामी- गो – या कारशी स्पर्धा करू शकतील असे कंपनीच्या वरीष्ठांचे म्हणणे आहे. मारूतीच्या नव्यानेच आलेल्या सिलॅरिओसाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षाकाळ आहे.
सिलॅरिओचे दरमहिन्याला ५००० युनिट इतके उत्पादन आहे मात्र या गाडीसाठीचे अॅटोमॅटिक गिअर बॉक्स पूर्णपणे भारतात तयार होत नाहीत तर ते इटालीमधून आयात करावे लागतात असेही समजते. अॅटोमॅटिक गिअरमुळे चालकाला पूर्ण अॅटोमॅटिक मोड किंवा पार्शल अॅटोमॅटिक मोड अशा दोन प्रकारे कार चालविणे शक्य होते.