शेन वॉटसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या व इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या भागासाठी देशभरातील सर्वच टीम तयार झाल्या असून त्यांच्याकडून आतापासूनच सर्व व्यूवरचना आखली जात आहे. राजस्थान रॉयल्सने आगामी काळात होत असलेल्या या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासोबतच माजी कर्णधार राहुल द्रविड मेंटरच्या भूमिकेत काम करणार आहे. राजस्थान रॉयल्सचे रघू अय्यर यांनी ही घोषणा केली.

वॉटसन पहिल्या आयपीएलपासूनच राजस्थानचा सदस्य आहे. रॉयल्सने २००८ मध्ये या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले होते. त्या वेळी वॉटसन मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. कर्णधारपदी नियुक्ती झाल्या नंतर बोलताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन म्हकणाला, राजस्थान रॉयल्स ही एक शानदार टीम आहे. संघाने मला नेहमी चांगली कामगिरी करण्याची संधी दिली. शेन वॉर्न आणि राहुल द्रविड या दोघांनी माझ्यावर विश्वास टाकला. २००८ प्रमाणे यश मिळवण्याचे माझे प्रयत्न असेल.’

आगामी काळात मेंटर म्हणून माजी कर्णधार राहुल द्रविड संघाची रणनीती ठरवताना युवा खेळाडूंना प्रेरित करण्याचे काम करेल. त्याने नवनियुक्त कर्णधार वॉटसनचे अभिनंदन केले. याबाबत बोलताना राहूल म्हाणाला, ‘वॉटसन फक्त शानदार अष्टपैलू खेळाडू नसून तो उत्तम क्रिकेटपटू आहे. खेळाडू आणि स्टाफची त्याला चांगली ओळख आहे. वॉटसनच्या नेतृत्वात रॉयल्स या वेळी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे.

Leave a Comment