पुरुषांसाठी संतती प्रतिबंधाची गोळी

शास्त्रज्ञांना आता पुरुषांसाठी संतती प्रतिबंधाची गोळी तयार करता येईल अशा द्रव्याचा शोध लागला आहे. पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर किंवा त्यासंबंधातल्या प्रेरणेवर कसलाही विपरीत परिणाम न होता त्यांची प्रजनन क्षमता कमी करणारी ही गोळी असेल. या औषधाचे उंदरावरले प्रयोग यशस्वी झालेले असून लवकरच त्याचा वापर माणसांवरही करता येऊ शकेल, असा विश्‍वास वाटायला लागला आहे. अमेरिकेतल्या एका संशोधन संस्थेत हे प्रयोग करण्यात आले. हे औषध नर उंदरांना दिले असता त्यांच्या शुक्राणूंची संख्या घटली असल्याचे आढळले. केवळ संख्याच घटली असे नाही तर त्या शुक्राणूंचा वेग आणि जोमही कमी झाला आणि त्यामुळे त्यांच्या मध्ये नवा जीव निर्माण करण्याची क्षमता राहिली नाही. म्हणजेच या औषधाने त्यांची प्रजनन क्षमता कमी झाली. त्याच वेळी करण्यात आलेल्या काही निरीक्षणांनुसार ही क्षमता कमी झाली असली तरी त्या उंदरांमध्ये भिन्न लिंगी प्राण्यांविषयी असलेले आकर्षण काही कमी झालेले नव्हते.

ही माहिती दाना ङ्गर्ब्ज या संशोधन संस्थेतील ज्येष्ठ संशोधक जेम्स ब्रॅडनर यांनी दिली. या औषधाचे कसलेही साईड इङ्गेक्ट उंदरावर झाले नाहीत. हा या औषधाचे एक चांगला गुणधर्म म्हणावा लागेल. अन्यथा सध्या महिलांसाठी वापरल्या जाणार्‍या गर्भविरोधक गोळ्यांचे काही गंभीर साईड इङ्गेक्टस् होत असतात. तसे ते पुरुषांसाठीच्या गोळीने होणार नाहीत. या औषधाचे दुसरे एक वैशिष्ट्य असे की, तिच्यामुळे होणारा हा परिणाम कायमचा नाही, तात्पुरता आहे. जोपर्यंत त्या गोळींचा अंमल शरीरावर सुरू असतो तोपर्यंतच शुक्राणूंच्या निर्मितीला प्रतिबंध आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट होते. ही गोळी बंद केल्यास प्रजनन क्षमता पुन्हा पूर्वीप्रमाणेच नॉर्मल होते.

सध्या पुरुषांसाठी अशी एखादी गोळी शोधून काढण्यात यावी असा बराच प्रयत्न चाललेला आहे. कारण संतती नियमनासाठी केवळ महिलांवर उपचार करून किंवा केवळ त्यांनाच गोळ्या, औषधे देऊन ङ्गायदा होत नाही. पुरुषांमध्ये अशा प्रकारचे एखादे औषध नसणे हे नको असलेल्या गर्भारपणाचे एक मोठे कारण असते. पुरुषांसाठी अशी गोळी शोधून काढली तर संतती प्रतिबंधाच्या कामात शंभर टक्के यश येईल असे तज्ज्ञांचे मत होते. या नव्या गोळीच्या शोधामुळे हे काम आता साध्य होणार आहे. पूर्वी संतती प्रतिबंधासाठी पुरुषांना इंजेक्शन दिले जात होते किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात होती. अर्थात अशा प्रकारचे उपाय हे पूर्णपणे डॉक्टरांवर अवलंबून होते आणि डॉक्टर उपलब्ध न झाल्यास अशा पुरुषांची अडचण होत होती. आता गोळी घेण्याच्या बाबतीत तो स्वावलंबी राहील. या औषधाला तूर्तास तरी या शास्त्रज्ञांनी जे क्यू-१ असे सांकेतिक नाव दिलेले आहे. लवकरच त्याच्या प्रगत चाचण्या घेतल्या जातील आणि ही गोळी पुरुषांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

अमेरिकेच्या कॅलिङ्गोर्निया विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आक्रोड खाल्ल्याने पुरुषाची प्रजनन क्षमता वाढते असे आढळून आले आहे. २० ते ३० वयोगटातील तरुणांवर या संबंधात काही प्रयोग करण्यात आले आहेत. या तरुणांना सलग तीन महिने दररोज ७५ ग्रॅम आक्रोड खायला दिले. तेव्हा त्यांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. त्याचवेळी प्रजनन क्षमता गमवून बसलेल्या अशाच काही लोकांची निरीक्षणे केली. या दुसर्‍या गटातल्या तरुणांना त्यांच्या नेहमीच्या सामान्य आहारावर ठेवण्यात आले. तेव्हा असे आढळले की, आक्रोड खाणार्‍याच्या प्रजनन क्षमतेत वाढ होत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment