टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी द्रवीडची नेमणूक करा-गावस्कर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून डंकन फ्लेचर यांची कामगिरी खूपच निराशा जनक झाली आहे. आगामी काळात टीम इंडियाच्या‍ प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नेमणूक करावी, असा सल्ला भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना सुनील गावस्कलर म्ह णाले, गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाची सध्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. विशेषता संघाचे प्रशिक्षक म्हाणून डंकन फ्लेचर यांनी पदभार घेतल्यािपासून कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. त्यामुळे संघाला तरुण प्रशिक्षकाची आवश्यकता आहे. मला असला वाटते राहुल द्रविड योग्य प्रशिक्षक सिद्ध होऊ शकतो.

टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना १० पैकी १.५ गूण देईन. फ्लेचर यांच्याऐवजी एका तरुण व्यक्तीला टीम इंडियाचं प्रशिक्षक बनवावे, असं मला वाटते. राहुल द्रविड असा व्यक्ती आहे, ज्याचा अतिशय आदर केला जात. शिवाय तो यशस्वी कर्णधारही होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्या होत्या.२०११च्या विश्वचषकानंतर फ्लेचर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र फ्लेचर यांच्यामुळे टीम इंडियाची कामगिरी सुधारली नाही. तसंच एक क्रिकेटर म्हणून त्यांची कामगिरी शानदार नाही,’ असं गावसकर म्हणाले.

Leave a Comment