मुंबई: आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्याा निवडणूका अवघ्या महिनाभरावर येवून ठेपल्यास आहेत. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या तरी मतदार याद्यांमध्ये अजूनही असंख्य चुका तर मतदान प्रक्रियेतील अनेक त्रुटी समोर येत आहेत. त्या मुळे गेल्याक काही दिवसांपासून सर्वत्र गोंधळाचे वातावरण असल्याने आपल्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल की नाही अशा संभ्रमावस्थेत नवतरुण मतदार आहेत.
रविवारी सर्वत्र मतदार याद्यांमधील चुकीच्या दुरुस्त्या, नवीन मतदारांचा समावेश, ओळखपत्राचे वाटप कामांकरिता गावागावात विशेष मोहिम आयोजित करण्यात आली होती. त्याप्रमाणे मुंबईतही ही मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यातत आली. परंतु मतदार तेथे गेल्यानंतर मतदार यादीत चुकीची नावे, तर यादीतून नावेच गायब, काहींनी फोटो देवूनही ओळखपत्र आलीच नाही तर एकाच व्यक्तीच्या नावे दोन ओळखपत्र, इंग्रजी नावातील स्पेलिंगमध्ये चुका इ. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिनाभरात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदान करता येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्तीकरिता फॉर्म नं ८ तर नवीन मतदार नोंदणीकरिता फॉर्म ६ भरून द्यायचा असतो. परंतु सदर फॉर्म हे अवघे दहाच उपलब्ध होते. त्यामुळे नंतर आलेल्यांना एकतर त्या फॉर्मची झेरॉक्स काढून आणावी लागत होती. किंवा हात हलवत परत जावे लागत होते. जवळ जवळ सर्वच ठिकाणी हे दिसत असल्याने निवडणुकीपूर्वी तरी या सर्व चुका संपवून गोंधळ कमी करावा अशी मागणी या नवीन मतदारातून केली जात आहे.