महिला आणि पुरूषांचे मेंदू सारखेच

महिला अधिक बुद्धीमान असतात का पुरूष हा वाद कितीही जुना आणि अजून कितीही वर्षे चालणारा असला तरी ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार महिला आणि पुरूषांच्या मेंदूत कांहीही फरक नसतो. हे संशोधन करणार्‍या एश्टन विद्यापीठातील न्यूरोसायन्सतज्ञ गिना रिपॉन सांगतात मुली आणि मुलांच्या मेंदूची क्षमता वेगळी असते असा समज असला तरी तो खोटा आहे. महिला आणि पुरूष वेगळ्या प्रकारे विचार करतात यात मेंदूचा दोष नाही तर लिंग आधारावर ही विचार करण्याची पद्धत ठरते.

रिपॉन म्हणतात, मुली आणि मुलांमध्ये मेंदूची रचना वेगळी असते याला विज्ञानाचा आधार नाही. महिलांना नकाशे समजत नाहीत किवा पुरूष सर्व तर्हेिची कामे करू शकत नाहीत या आधारावर मेंदू रचना वेगळी असते असा समज आहे. आपण ज्या जगात जगतो, तेथे महिला आणि पुरूषांसाठी लिंग आधारावर भूमिका ठरते. मुलींना खेळण्यासाठी बाहुल्या दिल्या जातात तर मुलांना सुपरमॅन दिले जातात. लहान पणापासूनच हे संस्कार होत असल्याने बाहुल्यांशी खेळताता मुली आपोआपच नारीसुलभ विचार करायला लागतात, तेच मुलांच्याबाबतीतही घडते.