मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी, निवडणूक आयोगाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे ९ मार्च रोजी मतदार यादीत १८ वर्ष पुर्ण झालेल्यां ना नाव नोंदवता येणार आहे. आपल्यास घरा जवळच्या मतदान केंद्रात जाऊन नाव नोंदवता येईल. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी २४ मार्चपर्यंतची मुदत आहे.

त्यामुळे ज्या नव्या मतदारांना किंवा मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना, येत्या निवडणुकीत मतदान करायचे आहे, त्यांच्यासाठी ही अखेरची संधी आहे. यंदा ८१ कोटी ४० लाख मतदार लोकसभेसाठी मतदान करतील. २००९ च्या म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी तब्बल १० कोटी मतदार वाढले आहेत.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी रहिवाशी पुरावा (रेशन कार्ड, लाईटबिल, फोन बिल यापैकी एक), छायाचित्र पुरावा (पॅनकार्ड, लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक), जन्म पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, दहावी-बारावीचे प्रमाणपत्र यापैकी एक), मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी पाच मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. सोळाव्या लोकसभेसाठी ७ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होत आहे. १२ मे पर्यंत मतदानाची प्रक्रिया होत असून, १६ मे रोजी निकाल लागणार आहे.

Leave a Comment