र्मिंगहॅम – ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील उपांत्यपूर्व फेरीत सरळ दोन गेममध्ये चीनच्या शिजियान वांगने सायनाला दो गेममध्ये सहजपणे पराभूत केले. त्यातमुळे आता सायना नेहवालला जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून पॅकअप करावे लागले. यापूर्वीच भारतीय बॅडमिंटनपटूनी पॅकअप केले असल्यायने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सायनाचे आव्हाॅन संपल्यानने भारतीय बॅडमिंटन फॅन्सरची निराशा झाली आहे.
सानिया नेहवालचे स्वप्न भंगले
या स्पर्धेत चौथ्या मानांकित शिजियान वांगने एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाला २१-१७, २१-१० अशा फरकाने धूळ चारली. यासह तिने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. निराशाजनक कामगिरीमुळे सायनाचे ४३ मिनिटांत अंतिम चारमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. जागतिक क्रमवारीतील दहावी आणि भारताची दुसरी खेळाडू पी.व्ही.सिंधूचा पहिल्या सामन्यातच पराभव झाला होता.
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला नमवून शिजियान वांगने उपांत्य फेरी गाठली. आता तिचा उपांत्य सामना दुस-या मानांकित यिहान वांगशी होईल. यिहानने उपांत्यपूर्व लढतीत कोरियाच्या याने जू बेईला पराभूत केले. तिने २१-८, २१-१३अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. यासह तिने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.