नवी दिल्ली – आगामी काळात होत असलेल्याा लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील १३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्येो महाराष्ट्रासतील काही दिग्गेज मंडळीना पुन्हार एकदा उमेदवारी देण्यालत आली आहे. या जाहीर करण्यात आलेल्या यादीत नांदेड लोकसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी धडपडणा-या माजी मुख्यामंत्री अशोक चव्हाणांना मात्र पहिल्या यादीत तरी लटकवण्यात आले आहे.
कॉंग्रेसने महाराष्ट्रासह देशातील १९४ उमेदवारांची नावे आज जाहीर केली. माजी मंत्री अमरीश पटेल (धुळे) यांचा अपवाद वगळता माणिकराव गावित (नंदुरबार), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), प्रतीक पाटील (सांगली), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) या विद्यमान खासदारांना कॉंग्रेसने पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. मात्र गेल्यां काही दिवसांपासून राजकारणापासून आलिप्तम असलेल्याा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हा ण यांचे नाव मात्र अडगळीत पडले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने रायगडच्या बदल्यात कॉंग्रेसला हातकणंगले, हिंगोली दिले आहे. त्या्मुळे आता दुस-या यादीत कॉंग्रेसकडून तेथील उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. हिंगोलीमधून राजीव सातव यांना उमेदवारी मिळण्यासची शक्याता आहे. तर हातकणंगले येथे कॉग्रेंसकडून कलप्पाअण्णा आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आागामी काळात जाहीर होत असलेल्या दुस-या यादीत तर अशोक चव्हाण यांचे नाव जाहीर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.