शिवसेना-भाजपामध्ये तेढ वाढले

मुंबई : गेल्या काही दिवसात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपामधील तेढ निर्माण झाले आहेत. या दोन्ही पक्षामधील संबंध ताणले जाण्यासाठी विधान परिषदेची निवडणूक कारणीभूत ठरली आहे. २0 मार्चला होणा-या या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्याकरिता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे शुक्रवारी राजभेटीसाठी कृष्णकुंजवर गेले होते. त्यािमुळे आगामी काळात भाजप-सेनेमधील संबध आणखीन ताणले जाण्याची शक्यता आहे.

२० मार्च रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत मनसेने भाजपाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्याळसाठी विनोद तावडे व अशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानी उद्यापर्यंत आपला निर्णय आम्हाला कळविणार आहेत, असे तावडे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.

रामदास आठवले यांना महायुतीत शिवसेनेने आणले पण त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठविले. त्यासाठी प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला बाजूला ठेवले. हे पाहता विधान परिषद निवडणुकीत शिवसेना एकच उमेदवार देईल, अशी आमची अपेक्षा होती. आम्ही त्यांना तशी विनंतीही केली होती. पण त्यांनी आम्हाला विश्वाेसात न घेता परस्पर दोन उमेदवार (नीलम गोर्हेह, राहुल नार्वेकर) दिले, या शब्दांत तावडे यांनी नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेची निवडणूक महायुती म्हणून लढली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तावडे यांनी केलेल्या आरोपाचे आता शिवसेनेकडून खंडन केले जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.