महाराष्ट्र शासनाची फिल्म उद्योगाला करमाफी

मुंबई – आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र शासनाने निवडणुकांच्या तोंडावर फिल्म उद्योगाला लीज कर सवलत जाहीर केली असून ही सवलत सहा वर्षांसाठी राहणार आहे. यामुळे शासनाला १२०० कोटींचा फटका बसणार आहे. राज्य कॅबिनेटने गेल्याच आठवड्यात विधानसभेच्या चार दिवसीय सत्रांत यावर निर्णय घेतला असून जूनमध्ये हा कायदा पास केला जाणार आहे असेही समजते.

राज्य शासनाने  फिल्म उद्योगावर कॉपी राईट आणि लिज टॅक्स महसूल वाढीसाठी २००२ मध्ये लागू केला होता. हा कर चार टक्के इतका होता आणि त्यातून दरवर्षी २०० कोटींचा महसूल शासनाला मिळणार होता. मात्र हा करच आता सहा वर्षांसाठी रद्द करण्यात आला आहे. अर्थमंत्रालयातील वरीष्ठ अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या तिजोरीत खणखणाट असल्यामुळे विकास योजनात २० टक्के कपात केली गेली आहे आणि फिल्म उद्योगाला मात्र करसवलती दिल्या जात आहेत. मनोरंजन कराशिवाय हा कर फिल्म उद्योगाला द्यावा लागणार होता.

Leave a Comment